Search

मे महिन्यात करावयाची शेतीची कामे- भाग – २

मे महिन्यात करावयाची शेतीची कामे- भाग – २
[Total: 6    Average: 3/5]

buttons eng-min

खरीप हंगाम जसजसा जवळ येऊ लागला आहे तसा शेतीतील कामांना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात मे महिन्यात करावयाची शेतीची कामे कोणती, याचा आढावा घेऊया.

पूर्वमशागत:

खरीप हंगामासाठी पुर्व मशागतीची कामे पुर्ण करावीत. जमिनीची नांगरणी करून मातीची ढेकळे फोडावीत, कुळवणी करून घ्यावी तसेच मशागतीची इतर कामे करावीत.  कारण योग्य नियोजनाअभावी जर पावसाच्या तोंडावर हि कामे केली गेली तर जमिनीत सुप्त अवस्थेत असलेली किड व रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जमीनिची मशागत मे महिन्यातच करून घ्यावी. मे महिन्यात जमिनीची मशागत करून घेतल्यास  उन्हामुळे जमीन तापून त्यातील अंडी, आळी, कोष उघड्यावर येतात. पक्षांसाठी हे खाद्य ठरते आणि त्यांचा नयनाट होतो.

नियोजन :

  • कोणत्याही कामासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.
  • विदर्भ मराठवाडा खान्देश विभागात बागायती कापसाची लागवड करावी लागवडी साठी कृषि विद्यापिठांनी संशोधीत केलेल्या सुधारीत किंवा संकरीत जातीची निवड करावी.
  • खरीप हंगामासाठी आवश्यक त्या प्रकाराची बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी पेरणीपूर्वी वेळेवर मिळण्याची तरतूद करावी.

फळबाग :

  • फळबागेची लागवड करावयाची असल्यास फळबागेच्या प्रकाराप्रमाणे योग्य अंतरावर आखणी करून ३ X ३ X ३ फूट आकाराचे खड्डे खोदून उन्हामध्ये चांगले तापू द्यावेत.
  • द्राक्षाला खतांचा हप्ता द्यावा एप्रिल छाटणी पूर्ण झाल्यास २०० किलो नत्र १०० किलो स्फूरद व ११० किलो पालाश प्रति हेक्टर प्रमाणे शेणखतासोबत द्यावे.

विविध पिके :

  • हळद, आले, सुरण या पिकांच्या लागवडीसाठी हळदीच्या राजापूरी, कृष्णा, कडप्पा, सेलम तर

आल्यासाठी माहिम जातीची निवड करावी.

  • पश्चिम महाराष्ट्रातील लागवड केलेला बागायती उन्हाळी कपाशीच्या वरखताचा दुसरा हप्ता द्यावा ४०

किलो नत्र.
अवजारांची जुळवाजुळव :

  • खरीप हंगामासाठी लागणारी अवजारे उदा. कुळव, दुचाडी पाभर कोळपी, खुरपी फवारणी पंप धुरळणी यंत्र इत्यादी. योग्य स्थीतीत दुरूस्त करून ठेवावीत.

पाणी:

जमिनीचा मगदूर, तापमान, बाष्पीभवन इ. विचारात घेऊन फळबाग ऊस व इतर उन्हाळी पिकासाठी पाणी द्यावे. तसेच गव्हाचे काड, ऊसाचे पाचट, भाताचा पेंढा, लाकडाचा भुसा, पॉलिथीन इत्यादीचे जमिनीवर अच्छादन करावे. हिरवळीच्या खतांसाठी पाण्याची उपलब्धता किंवा वळवाचा पाऊस झाल्यास जमिनीत भरपूर ओलावा झाल्यास ताग ३० ते ३५ किलो एकरी किवा धैचा १५ ते २० किलो एकर पेरणी करावी.

 

Related posts

Shares