Search

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन वेळेआधी होणार

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन वेळेआधी होणार
[Total: 0    Average: 0/5]

buttons eng-minसगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून या वर्षी महाराष्ट्रात लवकर दाखल होणार आहे. या वर्षी सरासरीपेक्षा मान्सूनदरम्यान अधिक पाऊस पडेल असे भाकीत भारतीय हवामान खात्याने याआधीच व्यक्त केले होते. आणि आता पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मान्सून अंदमानात लवकर दाखल होत असल्याने महाराष्ट्रातही त्याचे आगमन आगमन वेळेआधी होणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

यावर्षी मान्सून उत्तम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात मान्सून दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, उन्हाच्या काहिलीने बेजार झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भाग, निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण अंदमान बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक असेलला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण झालं. आहे. १६ ते १७ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीतादेवी यांनी दिली आहे. ३ ते ४ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे मान्सून वेळेआधी महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान बहुप्रतिक्षित मान्सून लवकरच येत असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

Related posts

Shares